जळगाव जिल्ह्यातील घरफोड्या धुळ्यात उघडकीस

जळगाव : धुळे एलसीबीच्या तपासात अटक करण्यात आलेल्या दोघांनी जळगाव, धुळे व मालेगावसह ठाणे येथील घरफोड्यांची कबुली दिली आहे. राजपालसिंग भादा, बाळूसिंग टाक अशी अटक करण्यात आलेल्या दोघा घरफोड्यांची नावे आहेत. त्यांनी एकूण नऊ घरफोड्या केल्याचे उघड केले आहे. त्यांच्या ताब्यातून ७३ हजार ५९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील दोघांचे इतर तिघे साथीदार आरोपी मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

धुळे, अमळनेर, पारोळा, मालेगाव व ठाणे येथील गुन्हे निष्पन्न झाले आहेत. धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, उपनिरीक्षक योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, कर्मचारी विंचूरकर, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, महेंद्र कापुरे, प्रकाश सोनार, संदीप सरग, संतोष हिरे, मनोज पाटील, कुणाल पानपाटील, गौतम सपकाळ, उमेश पवार, रवी राठोड, सागर शिर्के, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, किशोर पाटील, योगेश जगताप, कैलास महाजन यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here