पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण – दोघांना एक वर्ष कारावास

नाशिक :  नाशिक शहर वाहतूक पोलीस कर्मचा-यास मारहाण करणा-या आरोपीस एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी सागर अजित मेहेरोलिया व कपील दयानंद सौदे (दोघे रा. जयभवानी रोड नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जिल्हा न्यायमूर्ती आर. एम. शिंदे यांनी याप्रकरणी बुधवारी निकाल दिला आहे.

19 मार्च 2016 रोजी नाशिक शहरातील हॉटेल प्रिया समोर हा प्रकार घडला होता. यावेळी बाबासाहेब दहिफळे हे ड्युटीवर होते. आरोपींचे वाहन उचलून नेल्याचा राग मनात धरून दोघांनी पोलीस कर्मचारी दहिफळे यांना शिवीगाळ व अँट्रासिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. तसेच धक्काबुक्कीचा प्रकार देखील या दोघांनी पोलीस कर्मचारी दहिफळे यांच्यासोबत केला होता. या प्रकारणी सरकारवाडा पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एम.डी. म्हात्रे यांनी केला. साक्षी पुराव्यांच्या आधारे दोघांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने   अँड.आर.वाय. सुर्यवंशी, अपर्णा पाटील यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी एम.ए.पवार, आर.आर. जाधव यांनी या कामी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here