महिलेवर अत्याचार – डॉक्टरला पोलिस कोठडी

यवतमाळ : वैद्यकीय उपचारार्थ रुग्णालयात आलेल्या महिलेवर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या डॉ. गणेश साठे व त्याच्या पत्नीवर अवधुतवाडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेप्रकरणी डॉ. साठे यास अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी डॉक्टरची पत्नी तेजस्विनी साठे फरार असून पोलीस तिच्या मागावर आहेत.

सन 2017 मध्ये यवतमाळ येथील जुना उमरसरा भागातील डॉ. गणेश साठे याच्या दवाखान्यात एक महिला उपचार घेण्यासाठी आली होती. त्यावेळी उपचाराच्या नावाखाली डॉ. साठे याने त्या महिलेस चूर्ण खाण्यास दिले. चूर्ण खाल्यानंतर महिलेची शुद्ध हरपली होती. त्याचा गैरफायदा घेत डॉ. साठे याने तिच्यावर अत्याचार करत चित्रीकरण केले. ते चित्रीकरण प्रसारीत करण्याची धमकी देत तीन वर्षापासून डॉक्टर कडून महिलेवर अत्याचार सुरु होते. अखेर पिडीतेने याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसात डॉ. साठेसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. डॉ. साठे सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पत्नी फरार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here