तरुणावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी गुन्हा

जळगाव : चॉपरसारखे हत्यार, हॉकी स्टीक व बँट यांचा वापर करुन तरुणास मारहाण केल्याप्रकरणी तिघांसह त्यांच्या काही साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश दिलीप गडकर रा. चिंचोली ता. जळगाव या तरुणाने याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

31 डिसेंबरच्या रात्री जास्त बोलला या कारणावरुन निलेश यास गौरव शेळके (चिंचोली – जळगाव) याने 2 जानेवारीच्या रात्री चिंचोली बस स्थानकावर बोलावून घेतले. निलेश बस स्थानकावर आल्यानंतर त्याला गौरवने चॉपर सारख्या हत्याराने, दिनेश शेळके याने हॉकी स्टीक व गोपाल शेळके याने बँटने मारहाण करण्यास सुरुवात केली. वैद्यकीय उपचार झाल्यानंतर निलेशने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला या तिघांसह इतर 4 ते 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here