लोकसहभागातुन जळगावला हरित शहर करुया – पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे

जळगाव दि. 9 प्रतिनिधी – शहरातील सामाजिक संस्था, उद्योजक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्थानिक रहिवासी यांच्या लोकसहभागातुन शहरांमधील प्रत्येक ओसाड जागेवर वृक्षारोपण केले जावे. जेणे करून हरित शहर होण्यास मदत होईल, असे सांगत रामेश्वर कॉलनीतील नागरिकांचा उत्स्फूर्त लोकसहभागाचे कौतुक पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी केले व लोकसहभागातुन शहराला हरित शहर करूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

रामेश्वर कॉलनीमधील हरेश्वरनगरातील हनुमान मंदिर परिसरातील अमृत पाणीपुरवठ्याच्या रेमंड कॉलनी जलकुंभच्या खुल्या भुखंडावर वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते. जैन इरिगेशनच्या अनमोल सहकार्याने आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्तपणे होत असलेल्या वृक्षारोपण सृजनशिल उपक्रमाप्रसंगी जिल्हाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, सदस्य प्रो. सविता नंदनवार, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वक उदय महाजन, डॉ. अश्विन झाला, सुधीर पाटील, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील अतिन त्यागी, अनिल जोशी, उद्योजक सुबोध चौधरी, राधेशाम मणियार, तांबापुरा फाऊंडेशनचे अध्यक्ष मतिन पटेल, अमन फाऊंडेशनचे शाहिद सय्यद यांच्यासह परिसरातील दिपक मांडोळे, संदीप मांडोळे, अनिल घुले, दिपक संनसे, विक्की कचरे, यशवंत सपकाळे, सुमित देशमुख यांच्यासह रहिवासी उपस्थितीत होते. मान्यवरांसह नागरिकांनी मिळुन 250 देशी जातीच्या वृक्षाच्या रोपांची लागवड केली. यामध्ये बेहडा, करंज, पिंपळ, बुच, रिटा, वड, चिंच, पेल्टोफॉर्म, बकूळ, निंब, बेल, पारिजातक, कांचन, जांभूळ, पिंपळ बेंड, स्पॕथोलिया, गुलमोहर, सुरू, विलायती चिंच यांचा समावेश आहे. यावेळी विवेक होशिंग यांनी स्थानिक वृक्षांचे महत्त्व सांगत वृक्षसंवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. अतिन त्यागी यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व समजावुन सांगितले. ॲड. जमील देशपांडे यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा दिली. तसेच उपक्रमाबातची संकल्पना समजून सांगितली शहरातील आणखी खुल्या भुखंडावर वृक्षारोपण करायचे असल्यास गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि मराठी प्रतिष्ठानशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे स्वयंसेवक, जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी, मराठी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here