एमआयडीसी पोलीस स्टेशन बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन

जळगाव : एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात तयार करण्यात आलेल्या बहुउद्देदशीय सभागृहाचा उदघाटन सोहळा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते संपन्न झाला. कोनशीला अनावरणासह फीत कापून सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, सुप्रीम कंपनीचे मुख्य व्यवस्थापक संजय प्रभुदेसाई, एच डी फायर प्रोटेक्ट कंपनीचे संचालक मिहीर घोटीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सुप्रीम इंडस्ट्रीज जळगांव आणी एचडी फायर प्रोटेक्ट जळगांव यांच्या सीएसआर फंड निधीतून या बहुउद्देशीय सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोना काळात उत्कृष्ट कामगीरी करणा-या पोलीस पाटील बांधवांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देत सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सहायक फौजदार तुकाराम निंबाळकर, प्रचीती मिडीयाचे सचीन घुगे यांचादेखील सन्मान करण्यात आला. सुप्रीम इंडस्ट्रीज जळगावचे जी.के.सक्सेना, एच डी फायर चे जनरल मॅनेजर सुधीर पाटील, लघुउदयोग भारती जळगावचे प्रमुख समीर साने, पोलीस पाटील, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यावेळी उपस्थीत होते.

एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन आणी प्रास्तावीक केले. पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांनी सुत्रसंचालन केले. सपोनि प्रमोद कठोरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलिस उप निरीक्षक अनिस शेख, दिपक जगदाळे, रविंद्र गिरासे, निलेश गोसावी, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विश्वास बोरसे, शिवदास नाईक, दिपक चौधरी, सचीन पाटील, योगेश बारी, मंदार पाटील, सपना येरगुंटला यांचे विशेष सहकार्य लाभले. कोरोना नियमांचे पालन करत कार्यक्रम झाला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here