अँड. सदावर्ते यांच्याएवजी सतीश पेंडसे करणार युक्तिवाद

मुंबई : राज्य शासनात सेवा विलीनीकरण करण्याच्या मागणीवर मोठ्या संख्येतील एसटी कर्मचारी अद्यापही ठाम आहेत. त्यांचे आंदोलन सुरुच आहे. एस.टी. कर्मचारी संघटनेच्या वतीने यापुढील न्यायालयीन कामकाज आता अँड. सतीश पेंडसे पाहणार आहेत. अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून कामकाज काढून घेण्यात आले आहे. एस.टी. च्या संपावर तोडगा निघण्याची देखील शक्यता निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.

एसटी कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने आज सह्याद्री अतिथी गृहावर एक बैठक झाली. या बैठकीला एसटी कर्मचारी प्रतिनिधींसह रा.कॉं. चे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल प्रब होते. या चर्चेनंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपातील कर्मचा-यांनी कामावर हजर होण्याचे आवाहन विविध एसटी कर्मचारी संघटना प्रतिनिधींकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचा-यांची न्यायालयीन बाजू मांडण्याचे काम यापुढे गुणरत्न सदावर्ते बघणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले. यापुढे अँड. सतीश पेंडसे हे कर्मचा-यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. 22 संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here