मुंबई विमानतळावरील आगीच्या घटनेत जीवितहानी नाही

मुंबई : सांताक्रूझ येथील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागण्याची घटना आज घडली. एअर इंडियाच्या विमानाला पुशबँक देणा-या वाहनाला लागलेल्या आगीने मुंबई जामनगर या विमान उड्डाणाला विलंब झाला. या विमानात एकूण 85 प्रवासी संख्या होती.

या आगीने विमानाचे नुकसान व जीवितहानी झालेली नाही. या घटनेने विमानतळावर मोठा गोंधळ उडाला होता. दुपारी 12 वाजून 4 मिनिटांनी या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. या घटनेच्या माध्यमातून हा घातपात होता की अपघात याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here