बुधवार पेठेतील गणपती मंदिरात महाजन यांनी जावे – खडसे

पुण्याच्या बुधवार पेठेत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर असून त्या मंदिरात गिरीश महाजन यांनी सदबुद्धीसाठी जावे असे स्पष्टीकरण रा.कॉं. चे नेते एकनाथराव खडसे यांनी दिले आहे. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ महाजन यांनी घेतला असून “मनी वसे ते स्वप्नी दिसे” असा टोला देखील खडसे यांनी गिरीश महाजन यांना लावला आहे.

जळगाव शहरात मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे. त्या चौकशीत महाजना यांची चौकशी सुरु असून त्यांना कोरोनाची देखील लागण झाली असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर आगपाखड करत असल्याचे दिसत आहे. एकमेकांना बोलण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नसून जनता सध्या तरी बघ्याची भूमिका घेत असल्याचे देखील दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here