धरणगाव तालुका रा.कॉं. च्या वतीने सभासद नोंदणी अभियान

धरणगाव (धर्मराज मोरे) : जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले. धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अभियानापुर्वी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद याच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालण्यात आला.

सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, पुष्पाताई महाजन, तालुका अध्यक्ष धनराज माळी सर, युवक तालुका अध्यक्ष नाटेश्वर पवार, युवक शहर अध्यक्ष संभाजी धनगर, जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, कार्याध्यक्ष अरविंद आबा देवरे, सामाजिक न्याय विभाग कल्पना ताई अहिरे, बाजार समिती संचालक रंगराव सावंत, दिलीप अण्णा धनगर, युवक उपाध्यक्ष सागर वाजपेयी, नारायण चौधरी, अमोल हरपे, प्रदीप पाटील, दिनेश भदाणे, लीलाधर पाटील, भवरखेडे सरपंच किरण पाटील, गिरीश पाटील, शरद पाटील निशाणे, उत्तम भदाणे, देवेंद्र देसले, वासुदेव सपकाळे, भुषण पाटील, रघु नाना, रवी महाजन धानोरा, घनश्याम पाटील, दीपक भोई, गणेश पाटील विवरे, सतीश अण्णा पवार कवठळ, आकाश राणे, सागर भामरे, गोकुळ पारधी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here