सेवानिवृत्त पोलिसाचा सुनेकडून भलताच छळ– जीवे ठार करण्याच्या प्रयत्नात दोघांचे तिला बळ

काल्पनिक छायाचित्र

अहमदनगर : सेवानिवृत्त पोलीसाला त्याच्याच सुनेने दोघांच्या मदतीने विष पाजून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. जीवे ठार करण्याचा प्रयत्न व अन्य कलमांसह याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्यानदेव नामदेव जाधव (60) असे फिर्यादी सास-याचे नाव असून सोनाली संतोष जाधव (सून), वैभव उर्फ महेश बाळासाहेब सातपुते, बाळासाहेब सातपुते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

शनिवार दि. 8 जानेवारी रोजी फिर्यादी ज्ञानदेव जाधव हे पाथर्डी तालुक्यातील मोहोज येथून मोटार सायकलने आपल्या मुलाच्या घरी जात होते. वाटेत वडगाव गुप्ता शिवारात त्यांची सून सोनाली हिने त्यांना थांबवले. सुनेने थांबवल्यामुळे ते आपल्या ताब्यातील मोटारसायकल उभी करु लागले. त्याचवेळी सुनेने त्यांना जमिनीवर पाडले व ती त्यांच्या पायावर बसली. त्याचवेळी बाळासाहेब सातपुते याने त्यांचे हात धरुन ठेवले. वैभवने त्यांच्या तोंडात विष ओतून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न केला. “तु सेवानिवृत्त पोलीस असल्यामुळे मी दाखल केलेल्या गुन्ह्यात तुला अटक झाली नाही, मात्र याठिकाणी तुला कोण वाचवणार? असे वैभव घटनेच्या वेळी म्हणाला. या घटनेनंतर तिघांनी पलायन केल्यानंतर फिर्यादी ग्यानदेव जाधव याना वैद्यकीय उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी पोलिसांनी त्यांचा जवाब घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here