मोठ्या भावाची हत्या करणारा लहान भाऊ गजाआड

यवतमाळ (घाटंजी) : सतत पैशांची मागणी करुन आईला हैराण करणा-या मोठ्या भावाची लहान भावाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 11 जानेवारीच्या रात्री शहरातील घाटी परिसरात घडलेल्या घटनेतील आरोपी भावास पोलिसांनी अटक केली आहे. दीपक ज्योतिराव गेडाम (25) असे मयत भावाचे तर दिलीप ज्योतीराव गेडाम (22) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

लहान भाऊ दिलीप याने दीपकच्या पोटावर, मानेवर व छातीवर चाकूने सपासप वार करत त्याला जखमी केले होते. या घटनेत वैद्यकीय उपचारादरम्यान दीपकचा मृत्यू झाला. घाटंजी पोलिसांच्या पथकाने हल्लेखोर दिलीप यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास सिडाम यांच्यासह राहुल खंडागळे, विशाल वाढई करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here