गोळीबार घटनेतील पाचवा संशयित अटक

नाशिक : शेत जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील संशयितास पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून आता या अटकेतील संशयित आरोपींची संख्या पाच झाली आहे. माजिद आमीन खान असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेत जमिनीचा वाद वाढल्याने मालेगाव येथे झालेल्या घटनेत माजी महापौर अब्दुल मलिक व माजी नगरसेवक खलील शेख यांच्यात धक्काबुक्कीची घटना शनिवारी झाली होती. त्या घटनेचे पर्यावसान गोळीबारीच्या घटनेत झाले होते. पोलिसांनी अब्दुल मलिक, एहसान रमजान शेख, दीपक पवार व रवींद्र जोशी आदींना अटक करण्यात आली होती. दरम्यान तपासात फरार असेलल्या माजिद खान (रा. किल्ला) याला अटक करण्यात आली. मुख्य संशयित असलेला माजी नगरसेवक खलील शेख फरार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here