रेल्वे ब्लॉकमुळे 21 गाड्या धावल्या विलंबाने

जळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात जळगाव ते भादली दरम्यान चौथ्या मार्गावरील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्यात आले. बुधवारी करण्यात आलेल्या या कामासाठी चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.

या ब्लॉकसह बुरहानपूर रेल्वे स्टेशनवर बऱ्हाणपूर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग पॅनलचे देखील कामा करण्यात आले. त्यामुळे दुसखेडा ते सावदा दरम्यान साडेपाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. या ब्लॉकचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवासी वर्गाला बसला. या ब्लॉकमुळे कित्येक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सुरु झालेली भुसावळ इगतपुरी मेमू रेल्वे देखील रद्द करण्यात आली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here