जात विचारुन घर नाकारणा-या दोघांना अटक

औरंगाबाद : जात विचारुन ग्राहक वकिलास रो हाऊस घर खरेदी करण्यापासून वंचित ठेवणा-या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस स्टेशनला अँड. महेंद्र गंडले यांनी गुन्हा दाखल केला आहे.

अँड. महेंद्र गंडले यांनी संबंधित बिल्डरकडून जालना रोडवरील रो हाऊस घेण्याबाबत तयारी दर्शवली होती. तेथील कर्मचा-याने त्यांना त्यांची जात विचारली. ग्राहकाच्या रुपात आलेल्या वकील महोदयांनी आपली जात सांगितल्यानंतर त्यांना तेथील कर्मचा-याने घर विकण्यास नकार दिला. त्यांनतर त्यांनी बिल्डरचे कार्यालय गाठले. तेथेही त्यांच्या बाबतीत तसाच प्रकार घडला. अखेर अँड. महेंद्र गंडले यांनी चिकलठाणा पोलीस स्टेशन गाठत रीतसर फिर्याद दाखल केली. चिकलठाणा पोलीस स्टेशनला सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सागर गायकवाड व योगेश निमगुडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. सोमानी, जैन, मकरंद देशपांडे आणि इतरांची चौकशी सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here