कवट्या आणि हाडे आढळल्याने वर्धा जिल्ह्यात खळबळ

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील कदम हॉस्पिटलच्या परिसरात एका खड्ड्यात मानवी अर्भकाच्या कवट्या आणि हाडे आढळून आली आहेत. या सर्व कवट्या आणि हाडे नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीकामी पाठवण्यात आली आहेत. अकरा कवट्या आणि 52 हाडे अशी त्यांची संख्या आहे.

आर्वी येथील डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी बेकायदा गर्भपात झाल्याची घटना उघड झाली होती. याप्रकरणी डॉक्टर व अन्य दोघांना अटक केली होती. त्यानंतर रुग्णालय आवारातील एका खड्ड्यात या कवट्या आणि हाडे आढळून आली. अधिकृत गर्भपाताचा या दवाखान्याला परवाना असला तरी मृत अर्भकांची विल्हेवाट लावण्याची पद्धत याठिकाणी पाळली जाते अथवा नाही याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर खरा प्रकार समजणार आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here