सेवानिवृत्त स्वयंघोषित पीएसआयविरुद्ध गुन्हा

काल्पनिक छायाचित्र

धुळे : अकरा महिन्यासाठी दिलेली पीएसआयची पदोन्नती नंतर काढलेल्या व सध्या सेवानिवृत्त असलेल्या सहायक फौजदार (एएसआय) विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आखाडे असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सहायक फौजदार (तथाकथित पीएसआय)चे आडनाव आहे. गुन्ह्यात जप्त केलेली कार सोडवण्यासाठी पंटर मार्फत लाच मागितल्याप्रकरणी नाशिक एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीनंतर धुळे शहर पोलिसात मंगळवारी स्वयंघोषित पीएसआय व पंटर अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकाची कार सन 2019 मध्ये एका गुन्ह्यात शहर पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आली होती. सदर कार तक्रारदारास सोडवायची होती. ती कार सोडवण्याकामी न्यायालयास पूरक अभिप्राय देण्यासाठी स्वयंघोषित पीएसआय तथा सेवानिवृत्त एएसआय आखाडे याने तक्रारदारास लाच मागितली होती. सुरुवातीला तीन लाख व तडजोडीअंती 2 लाख 80 हजार रुपयांची मागणी तक्रारदारास करण्यात आली होती. खासगी पंटर परेश गुरव याने लाचेची रक्कम स्वीकारण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली होती. तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर धुळे शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कागदापत्रांव्यातिरिक्त सर्वत्र याबाबत “पीएसआय” असा उल्लेख करण्यात आला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here