भोळसर तरुणीवर अत्याचार – आरोपीस सक्तमजुरी

औरंगाबाद : पाण्याने भरलेली कॅन आणून दिल्या दहा रुपये देण्याचे आमिष दाखवत 19 वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करणा-या आरोपीस अँट्राँसिटी व विनयभंगाच्या कलमाखाली एक वर्ष सहा महिने सक्तमजुरी तसेच इतर कामालांखाली साडेपाच हजार रुपये दंडात्मक शिक्षा सुवावण्यात आली आहे. भगवान किसन बलांडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यातील फिर्यादीची 19 वर्ष वयाची मोठी मुलगी भोळसर आहे. 4 सप्टेबर 2020 रोजी आरोपी बलांडे याने तिला एक कॅन भरुन पाणी आणण्यास सांगितले. त्या बदल्यात त्याने तिला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवले. यावेळी फिर्यादी व तिच्या दोन्ही मुली घराजवळ उभ्या होत्या. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परत आली नाही म्हणून फिर्यादी तिला बघण्यासाठी आरोपी भगवान बलांडे याच्या घरी गेली. त्यावेळी आरोपीच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. फिर्यादीने दार ठोकून पिडीतेला आवाज दिला. काही वेळाने आरोपी बलांडे याने दरवाजा उघडला. आत हजर असलेल्या पिडीतेला घेवून फिर्यादी घरी आली.

पीडितेची विचारपूस केली असता बलांडे याने तिच्यावर बळजबरी बलात्कार केल्याचे फिर्यादीस समजले. या घटनेप्रकरणी वडोदबाजार पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी एकूण दहा साक्षीदारांचे जवाब घेतले. साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी भगवान बलांडे याला दोषी ठरवत एक वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपयांचा दंड, अँट्रॉसिटीच्‍या कलमानुसार सहा महिने सक्तमजुरी तसेच पाचशे रुपयांचा दंड ठोठावला. दोन्‍ही शिक्षा आरोपीने वेगवेगळ्या स्वरुपात भोगायच्‍या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here