औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकिलांच्या जागा रिक्तच

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद‎ खंडपीठात सहायक सरकारी‎ वकिलांच्या तब्बल 55 जागा रिक्त आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरात प्रसिद्ध करून वर्ष उलटले आहे. मात्र अद्याप सहायक सरकारी वकिलांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत.

या जागा भरण्यासाठी तातडीने पुढील प्रक्रिया करण्यात यावी याबाबत खंडपीठात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. न्या. संजय‎ गंगापूरवाला व न्या. श्रीकांत‎ कुलकर्णी यांच्याकडून याप्रकरणी राज्य‎ शासनाच्या विधी व न्याय विभागास‎ नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 4 जानेवारी रोजी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यास एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. अँड. विशाल बागल, अँड.‎ ज्ञानेश्वर पवार, अँड. दीपक‎ राजपूत, अँड. विष्णू जावरे, अँड.‎ महेश तौर, अँड. विनायक नरवडे व‎ अँड. भरत लोंढे यांनी अँड. सचिन‎ देशमुख यांच्या वतीने सहायक सरकारी वकिलांच्या जागा भरण्यासाठी याचिका‎ दाखल केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here