भट्टीत स्पंज आयर्न जास्त टाकल्याने एक मृत्युमुखी

काल्पनिक छायाचित्र

जालना : क्रेनचालकाने भट्टीत जास्त प्रमाणात स्पंज आयर्न‎ टाकल्यामुळे भट्टीत वितळलेल्या‎ लोखंडाच्या रसायनाची मोठ्या प्रमाणात वाफ तयार झाली. ती वाफ अंगावर उडाल्याने एक मृत्युमुखी पडल्याची घटना जालना शहरात घडली आहे. रामाबकीश बिंद असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. 13 जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी क्रेनचालक‎ व कंपनी मालकाच्या विरोधात चंदनझिरा पोलिस‎ स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  

या दुर्दैवी घटनेत भट्टीजवळ काम‎ करणारे दोघे जखमी झाले होते. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अधिक उपचारार्थ त्यांना औरंगाबाद येथे‎ हलवण्यात आले होते. यातील‎ रामबकीश बिंद याचे निधन झाले. कंपनी मालकाने कामावरील कामगारांना‎ ‎ हेल्मेटसह इतर साधनसामग्री, अग्निरोधक‎ वस्त्रे, प्रथमोपचार साधने व भट्टीवर कुशल‎ कामगार नेमले नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले‎. संजय बन्सबहादूर सिंग  यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनी मालक व क्रेनचालक रवी तिवारी‎ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात‎ आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक‎ देविदास शेळके करत आहेत.‎

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here