बालिकेसोबत अश्लील कृत्य करणा-या वृद्धाला कारावास

अकोला : चार वर्षाच्या बालिकेचा विनयभंग तसेच तिच्यासोबत अश्लील वर्तन करणाऱ्या 70 वर्षाच्या वृद्धास अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी पिडीत बालिकेच्या आईने बाळापुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. महादेव दगडू जोंधळे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या वृद्ध आरोपीचे नाव आहे.

चॉकलेट देण्याचा बहाणा करत आरोपी हा पिडीत बालिकेच्या घरात जात असे. घटना घडली त्यावेळी पिडीतेची आई अंगणात धुणीभांडी करत होती. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने आरोपीने बालिकेला बाहेर नेले होते. बराच वेळ झाला तरी बालिका घरी आली नाही. त्यामुळे तिच्या आईने तिचा बराच शोध घेतला होता. बालिकेचा शोध घेत असतांना ती आरोपीच्या घरी गेली असता त्याठिकाणी तिला आरोपीचे खरे रुप दिसून आले. त्याठिकाणी आरोपी बालीकेसोबत अश्लील वर्तन करत होता.

http://crimeduniya.com/?p=16223

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव यांच्या न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने या खटल्यात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला पाच वर्ष कारावास व तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने प्रमुख जिल्हा सरकारी वकील अँड. राजेश्वर देशपांडे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here