नशीब बलवत्तर म्हणून रेल्वेगाडीखाली वाचला जीव

नाशिक : रेल्वे प्लँटफॉर्मवर उभा असलेला प्रवासी तोल जावून रेल्वे ट्रँकवर पडताच पलीकडून मालगाडी आली आणि एकच हल्लकल्लोळ माजला. मात्र त्या प्रवासी तरुणाच्या जीवनाची दोरी बळकट होती. रेल्वे लाईनच्या मधोमध पडल्याने गाडी पुढे जावून देखील त्याचा जीव वाचल्याची घटना नाशिक रेल्वे स्टेशनवर घडली. प्रकाश शिंदे असे जीव वाचलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रकाश बाबुराव शिंदे हा प्रवासी आपल्या परिवारासह शनिवारच्या दिवशी नाशिक रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक आठवर उभा होता. यावेळी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांची आरडाओरड ऐकून मालगाडीच्या चालकाने गाडी उभी केली. गाडीखाली आलेल्या तरुणाला पोलिसांनी बाहेर काढले. त्याला इजा झाली असली तरी त्याचा जीव वाचला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here