तुळजाभवानी मंदिरात बेशिस्त पुजा-यांना बंदी

तुळजापूर : निजामाकाळापासून तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी असतांना तेथे अनाधीकारे प्रवेश करण्यासह सुरक्षा रक्षकाला मारहाण करणे, गाभाऱ्यात फोटो काढणे अशा स्वरुपाचे बेशिस्त वर्तन करणा-या अकरा पूजा-यांविरुद्ध तीन महिने मंदिरबंदीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलेल्या आदेशाने सदर कारवाई करण्यात आली आहे.

मंदिर समितीने ९४२०९६२२३३ हा व्हॉट्सअँप क्रमांक प्रसिद्ध केला असून या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या क्रमांकावर आलेल्या तक्रारींची दाखल घेऊन कारवाई केली जाणार आहे. या क्रमांकाच्या आधारे बेशिस्त पुजा-यांच्या वर्तनावर लगाम लागण्यास मदत होणार आहे. अशा कारवाईत सातत्य राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here