क्रिकेटवर सट्टा लावणारे न्यायालयीन कोठडीत

औरंगाबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० क्रिकेट सामन्यावर फोनच्या माध्यमातुन पैसे लावून सट्टा खेळण्या प्रकरणी अटकेतील नाशिकच्या तिघा आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. एम. पोतदार यांनी याप्रकरणी आदेश दिले आहेत. सद्दाम जुल्फेकार शेख, अमित मदन बुऱ्हाडे आणि अमोल कापडणीस (सर्व रा. नाशिक) अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.

यापूर्वी तबरेझ खान, वसीम खान आणि आसेफ शेख यांना अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळी त्यांच्याकडून  पाच मोबाइल, दोन दुचाकी व साडेपाच हजार रोख असा जवळपास 1 लाख 36 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here