भूतप्रेत काढण्यासाठी भोंदू मांत्रीकाचा बहाणा—- तरुणीवर अत्याचार करत झाला परगावी रवाना

यवतमाळ : मानसिकता बिघडलेल्या तरुणीच्या अंगात भूत असल्याचे सांगून तिच्यावर अत्याचार करणा-या आदिलाबाद येथील भोंदू मांत्रिकाविरुद्ध यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर अण्णा असे गुन्हा दाखल झालेल्या व तरुणीवर जबरी अत्याचार करणा-या मांत्रिकाचे नाव आहे.

यवतमाळ येथील 23 वर्ष वयाची एक तरुणी सतत चिडचिड करत होती. एका परिचिताने आदिलाबाद येथील शेखर अण्णा नावाचा एक मांत्रिक अंगातील भुत काढत असल्याचे सांगितले. बोलावण्यानुसार शेखर अण्णा नावाचा मांत्रीक त्याच्या दोन साथीदारांसह यवतमाळ शहरात आला. आल्यानंतर त्याने लिंबू कापत तरुणीवर उपचाराचा चार ते पाच दिवस देखावा केला. त्यानंतर 28 जानेवारी रोजी शेखर अण्णा याने शैतान बडा शक्तीशाली है असे सांगत तिला एकटी सोडून जाण्यासाठी तरुणीच्या नातेवाईकांवर दडपण टाकले.

हे देखील वाचाअनैतिक संबंधातून आई उठली मुलाच्या जीवावर! प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर!! http://crimeduniya.com/?p=16569

त्याच्या बोलण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी तरुणीला त्याच्याजवळ एकटी सोडून निघून गेले. त्यानंतर संधी साधत शेखर अण्णा याने हतबल तरुणीवर बळजबरी अत्याचार केले. कुणाला काही सांगितल्यास जिवे ठार करण्याची धमकी दिली. त्यानंतर शेखर अण्णा आपल्या साथिदारांसह आदिलाबाद येथे निघून गेला. याप्रकरणी तरुणीच्या कुटूंबियांनी यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार शेखर अण्णाविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरिक्षक जनार्दन खंडेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here