लुटमार करणाऱ्याची चोपडा शहरात धिंड

जळगाव : ओमनी चालकाकडून जबरीने रोख रक्कम हिसकावण्याची घटना चोपडा शहरातील बस स्थानकाजवळ घडली होती. या घटनेप्रकरणी चोपडा शहर पोलिस स्टेशनला पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेत सहभागी असलेल्या टकल्या गवळी यास अटककेनंतर त्याची चोपडा शहरातून धिंड काढण्यात आली. इतर फरार चौघा जणांचा शोध घेण्यात येत आहे.

हारुन शेख कमरोद्दीन या ओमनी कारचालकास त्याच्या त्याब्यातील वाहनासह काही अनोळखी संशयितांनी अडवणूक करत शिवीगाळ व दमदाटी केली होती. टकल्या गवळी याने मारहाण करत हारुन शेख या वाहनचालकाच्या खिशातील 6 हजार 300 रुपये हिसवण्यात आले होते. टकल्या गवळी यास अमळनेर न्यायालयाने तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here