जळगावच्या डॉ. विवेक चौधरी यांच्या दवाखान्यात रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप

जळगाव :  जळगाव येथील डॉ. विवेक चौधरी यांच्या गजानन हॉस्पीटलमधे मृत्यु झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. 2 ते 3 फेब्रुवारी दरम्यान डॉ. विवेक चौधरी दवाखान्यात गैरहजर तसेच रुग्णाची तब्येत नाजुक असतांना सहायक डॉक्टरांच्या भरोशावर इलाज झाल्याचा आरोप यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी केला. याशिवाय इतर अनेक आरोप यावेळी  करण्यात आले. सुनिल चौधरी रा. चौगुले प्लॉट असे उपचारादरम्यान निधन झालेल्या रुग्णाचे नाव आहे.

जळगाव शहरात बीएसएनएल ऑफीससमोर डॉ. विवेक चौधरी यांचे गजानन हॉस्पीटल आहे. या दवाखान्यात हार्ट्च्या उपचारासाठी सुनिल चौधरी यांना दाखल करण्यात आले होते. मात्र लहान मेंदूने काम बंद केल्याने त्यांचा मृत्यू झाला असे नाव न सांगणा-या मात्र हजर असलेल्या तथाकथीत डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगीतले. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या तथाकथित डॉक्टरकडे विचारणा करण्यासाठी गेले. त्यावेळी आपल्याला वैद्यकीय क्षेत्राचे ज्ञान नसून उपचार फाईलमधे नमुद असल्याचे त्यांनी सांगीतले. डॉक्टरांनी योग्य उपचार केले असून ते दोन तासापासून ऑपरेशनमधे व्यस्त असल्याचे हजर असलेल्या संबंधीताने सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांना सांगीतले. ऑपरेशन थिएटर कुठे आहे अशी विचारणा केली असता  डॉक्टर जळगावच्या बाहेर ऑपरेशनकामी गेले असल्याचे त्या उपस्थीताने सांगीतले. डॉक्टर कालपासून दवाखान्यात नसल्याचे उघड होत असतांना हा खोटेपणा उघड होताच वैद्यकीय ज्ञान नसलेल्या तथाकथीत डॉक्टरची बोलती बंद झाली. एकंदरीत सर्वच प्रकार गोलमाल असल्याचे  दिसून आले.

वैद्यकीय  क्लेचे कागदपत्र आणि बिलाची 4 लाख 22 हजार रुपयांची रक्कम मिळेपर्यंत रुग्णाला व्हेंटीलेटरवर दोन दिवस ठेवले असा एक आरोप यावेळी नातेवाईकांनी केला. डॉ. विवेक चौधरी यांच्या गैरहजेरीत ज्या कुणा डॉक्टरांनी इलाज केला ते रुग्णाच्या नातेवाईकांना कोणतीही व्यवस्थित माहिती देत नसल्यामुळे नातेवाईक अजूनच संतापले होते. यावेळी संतप्त नातेवाईकांना योग्य ते रितसर मार्गदर्शन सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी केले. मात्र  मयत रुग्णाच्या  नातेवाईकांनी शव चिकित्सेसह पोलिसात तक्रार देण्याचे टाळत  रुग्णाला घरी नेल्यानंतर तेथील वातावरण शांत झाले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here