संशयास्पदरित्या फिरणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

jain-advt

जळगाव : रात्रीच्या वेळी संशयास्पदरित्या फिरणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे. तनवीर शेख चांद (23) रा. दत्तनगर मेहरुण जळगांव, जुम्मा सलीम पिंजारी (31) रा, तांबापुरा महोदव मंदीराजवळ, मजरखान सकायतखान (25) रा, पिंप्राळा हुडको, जळगांव अशी ताब्यात घेतलेल्या तिघा संशयीतांची नावे आहेत. ताब्यातील तिघे जण 3 फेब्रुवारीच्या रात्री आपले अस्तित्व लपवून चेह-याला दुपट्टा बांधून फिरतांना गुन्हे शोध पथकाच्या हाती लागले.

एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील बंद असलेल्या ट्रायडंट स्टील या कंपनीच्या आवारात तिघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस पथकाला बघून तिघे जण पळून जात असल्यामुळे पोलिसांच्या त्यांच्यावरील संशय बळावला. पो.कॉ. सतिष विठ्ठल गर्जे यांनी तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 122 (क) प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे. सहायक फौजदार अतुल पंजारी, पो.ना. मुद्दसर काझी, पो.ना. विकास सातदीवे, पो.ना. सुधीर साळवे, पो.ना. योगेश बारी, पो.कॉ. साईनाथ मुंढे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here