महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – जळगाव जिल्ह्याचा संघ जाहीर

जळगाव : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादाप्रमाणे यावर्षीही आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा आयोजित करत आहे. सदर स्पर्धा 14 वर्षाखालील मुलांसाठी आहेत.
जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची प्राथमिक निवड नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सराव शिबिर व दोन सराव सामने यांच्या माध्यमातून वीस जणांचा अंतिम संघ आज पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. वरुण पाटील (कर्णधार), मानस पाटील, राज राजपूत, तनय प्रसाद, श्लोक महाजन, दर्शन सोनवणे (यष्टीरक्षक), यश अग्रवाल, मोहित जगताप, आर्यन पाटील, प्रतीक शिंदे (उपकर्णधार), प्रणव जाधव, केशव ठाकुर, दिविक उपाध्याय, पियुष पवार, आदित्य वाणी, सोहम बडगुजर, अभय वाघमोडे, कृष्णा महाजन, जैनम जैन आणि आर्यन बडगे.

जळगाव जिल्हा संघाचे सामने अंबिशियस क्रिकेट क्लब पुणे, पूना क्लब, पुणे व सातारा जिल्हा क्रिकेट संघ यांच्याशी खेळले जातील. जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची निवड संजय पवार, संतोष बडगुजर, व प्रशांत ठाकूर यांच्या निवड समितीने केली आहे, या संघास जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे अध्यक्ष श्री अतुल जैन सचिव श्री अरविंद देशपांडे व इतर सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here