जळगावात कॅल्शियम कार्बाईड विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांच्या कारवाया

जळगाव : मानवी जीवीतास हानीकारक असलेल्या कॅल्शियम कार्बाईड या ज्वालाग्राही पदार्थाची जळगाव शहरात अवैध विक्री करणा-या विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र राबवण्यात आले. याप्रकरणी दोन ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात आली.

पहिल्या कारवाईत एमआयडीसी परिसरात काशिनाथ चौकातील झेनीथ हार्डवेअर या दुकानात कॅल्शियम कार्बाईड या ज्वालाग्राही पदार्थाची विक्री होत असल्याचे उघडकीस आले. अब्देअली शब्बीर नगरी (24) आईस फॅक्टरी जवळ, अरसीवाला कॉलनी, शिवाजी नगर, जळगाव असे कारवाई करण्यात आलेल्या दुकानदाराचे नाव आहे. झेनिथ हार्डवेअर या दुकानात टाकलेल्या छाप्यात आठ हजार रुपये किमतीचा गोलाकार लोखंडी ड्रम हस्तगत करण्यात आला. या ड्रममधे सुमारे 50 किलो कॅल्शियम कार्बाईडचे दगड आढळून आले आहेत.

दुस-या कारवाईत नेरी नाका परिसरातील विजय हार्डवेअर या दुकानावर छापा टाकण्यात आला. विजय गोविद भंगाळे (48) रा. योगेश्वर नगर, जुने जळगाव असे या दुकानदाराचे नाव आहे. या दुकानातून सुमारे चार हजार रुपये किमतीचे 25 किलो वजनाचे लोखंडी ड्रममधील दगडी खड्याच्या स्वरुपातील कॅल्शिमय कार्बाईड जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रताप शिकारे यांच्या गुन्हे शोध पथकातील स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. इम्रानअली सैय्यद, पो.ना. सचिन पाटील, पो.ना. सुधीर सावळे, पो. को गोविदा पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here