बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस तिन वर्ष कारावास

जळगाव : बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस तिन वर्ष कारावासाची शिक्षा आज सुनावण्यात आली. विश्वास मुकेश भिल असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायधीश श. ग. ठुबे यांच्या न्यायालयाने सदर शिक्षेची सुनावणी केली.

पोक्सो कलम 7,8 नुसार दोषी धरण्यात आलेल्या आरोपी विश्वास भिल यास तिन वर्ष कारावास तसेच पाच हजार रुपये दंड सुनावला. दंडाच्या रकमेतील चार हजार रुपये पिडितेस देण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले आहेत. तपासी अंमलदार पोलिस उप निरीक्षक अशोक अहिरे यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण केला. सरकारी अभियोक्ता वैशाली महाजन यांनी न्यायालयीन कामकाजात एकुण सात साक्षीदारांची तपासणी केली. आरोपी विश्वास भिल हा सध्या जेलमधे आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here