डॉ.सुवर्णा वाजे हत्येप्रकरणी पती संदीपची कोठडी 16 पर्यंत

नाशिक : नाशिक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांना जाळून ठार  केल्याच्या आरोपाखाली  अटकेत  असलेल्या  संदिप वाजे याची पोलिस कोठडी 16 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून करुन मृतदेह कारमधे जाळल्याचे तपसाअंती निष्पन्न झाले आहे.

कौटूंबिक वादाची  किनार या हत्येला तपासात दिसून येत आहे. डॉ. सुवर्णा संदीप वाजे यांचा जळीत मृतदेह आढळून आलेल्या कारमधे एक चाकू देखील पोलिसांना मिळाला आहे. कारमधे मिळालेला चाकू, मोबाईलमधून डिलीट केलेले चॅट या बाबी संशयास्पद आहेत. याशिवाय संदिप वाजे याच्या नावाने लिहिलेल्या चिठ्ठीत दुस-या लग्नाचा उल्लेख आला आहे. संदिप वाजे याला दुसरे लग्न करायचे असल्यामुळे त्याने पत्नी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या केल्याचा युक्तीवाद न्यायालयात सरकारपक्षाच्या वतीने करण्यात आला. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here