तलवारी बाळगणारा एलसीबीकडून जेरबंद

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तलवारी बाळगणा-या तरुणास यावल तालुक्यातील न्हावी या गावातून जेरबंद केले आहे. केतन मधुकर पाटील असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

न्हावी गावातील वाणीवाडा भागातील रहिवासी केतन मधुकर पाटील याच्या कब्जातून तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. तलवारीच्या धाकावर तो गावात व परिसरत दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे. कॉ. महेश महाजन, अक्रम शेख, याकुब शेख, चालक विजय चौधरी यांना पुढील कारवाईकामी रवाना केले. पथकाने केतन पाटील याचा ठावठिकाणा मिळवून त्याला तलवारीसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हे देखील वाचा – मलायकाच्या अदा बघून चाहते झाले घायाळ http://crimeduniya.com/?p=16860

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here