कंटेनरच्या धडकेत जळगावचे दोघे ठार

जळगाव : भरधाव कंटेनरच्या धडकेत कारमधील जळगावचे दोघे ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. या भिषण अपघाताची माहिती समजताच जळगावमधील त्यांच्या आप्तजणांमधे शोककळा पसरली आहे. प्रकाश बागरेचा(70),कमलाबाई जैन(65) अशा दोघा भाऊ बहिणीचा या अपघातात मृत्यु झाला आहे. कारचालकासह बांधकाम व्यावसायीक नरेंद जैन, नमन जैन, लभोनी जैन, विजय शांतीलाल जैन हे जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विजय जैन यांच्यावर जळगाव येथे तर इतर जखमींवर एरंडोल येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.

जळगावचे बांधकाम व्यावसायीक नरेंद्र जैन हे आपल्या परिवारासह धुळे शहरातील बोरकुंड येथे देवदर्शनानिमीत्त गेले होते. जळगावला परत येतांना वाटेत एरंडोल नजीक महामार्गावर हॉटेल कृष्णाजवळ समोरुन येणा-या भरधाव कंटेनरने त्यांच्या कारला जबर धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू तर इतर जखमी झाले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here