जळगाव जिल्हा कारागृहात बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

jain-advt

जळगाव : जळगाव जिल्हा उप कारागृहात एका बंदीवानाने रुमालाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच हा प्रकार दुस-या बंदीवानासह गस्तीवरील रक्षकांच्या लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे (रा.खेडी बुद्रुक ता. जळगाव) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या बंदीवानाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बराक 3 मधे हा प्रकार घडला.

हत्येच्या गुन्ह्यात संशयीत आरोपी म्हणून बंदी असलेल्या अमोल सोनवणे याने लोखंडी गजाला रुमालाच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवण्याचा मध्यरात्री प्रयत्न केला. मात्र सोबतच्या कैद्याच्या लक्षात हा प्रकार लक्षात आला. त्याने आरडाओरड करत त्याला रोखून धरले. गस्तीवरील सुरक्षा रक्षकांनी धाव घेत त्याचा जीव वाचवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here