खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी जळगाव एलसीबीने केला गजाआड

jain-advt

जळगाव : खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. जामनेर पोलिस स्टेशनला दाखल अकस्मात मृत्यूच्या तपासात या खूनाची उकल झाली आहे. पवन अशोक माळी (बोदवड जि.जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून शुभम माळी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी पवन माळी यास बोदवड तालुक्यातील नाडगाव येथून अटक करण्यात आली आहे.

31 जानेवारी 2022 रोजी जामनेर बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या पुलाखाली एक इसम मृतावस्थेत मोटार सायकलसह आढळून आला होता. याप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती. सकृतदर्शनी हा खूनाचा संशयास्पद प्रकार वाटत असल्यामुळे पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. किरणकुमार बकाले यांना समांतर सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते.

मयत व टॅंकरवर चालक असलेला मयताचा मामेभाऊ पवन माळी यांच्यात पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद झाला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना समजली होती. घटनास्थळावरील फुटेजमधे मयत शुभम माळी व आरोपी पवन माळी सोबत दिसून आले होते. पवन यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. मयत शुभम नंदु माळी यास पैश्याच्या कारणावरुन मारहाण करुन त्याची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. त्याच्याविरुद्ध जामनेर पो.स्टे.ला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे करीत आहेत. या तपासकामी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सफो अशोक महाजन, पोलिस हवालदार सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पो ना किशोर राठोड, पो ना रणजीत जाधव, पो ना श्रीकृष्ण देशमुख, पो कॉ विनोद पाटील, चालक पो ना मुरलीधर बारी संदिप सावळे, ईश्वर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here