बेपत्ता स.पो.नि. संग्राम ताटे सापडले बेशुद्धावस्थेत

जालना : गेल्या 2 फेब्रुवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असलेले लाचलुचपत विभागात कार्यरत असलेले सहायक पोलिस निरिक्षक संग्राम ताटे शिरवळ येथे बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

मित्राला भेटण्यासाठी जात असल्याचे कारण सांगून स.पो. नि. ताटे घरातून गेले होते. त्यानंतर त्यांचा कुठेही तपास लागत नव्हता. घराबाहेर जातांना त्यांनी गाडी, मोबाईल नेला नव्हता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. विस दिवसांपुर्वी त्यांची पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती व कोकणात बदली झाली होती. याच कालावधीत ते बेपत्ता झाले होते.

रविवार दि.13 फेब्रुवारी रोजी तेरा दिवसांनी दुपारच्या वेळी शिरवळ येथे ते एका जणाला बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्या व्यक्तीच्या दृष्टीने ते अनोळखी होते. मात्र त्यांच्या हातावर मोबाईल नंबर नमुद केलेला होता. त्या क्रमांकावर त्या व्यक्तीने फोन केला असता तो कॉल त्यांच्या पत्नीने उचलला व त्यानंतर पुढील ओळख पटवण्याची प्रक्रीया सुरु झाली. त्यात त्यांचा तपास लागला. दरम्यान ते कुठे गेले होते? त्यांना कुणी नेले होते का? हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here