प्रेमसंबंधातून मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीचा मृत्यू

औरंगाबाद : प्रियकराच्या मदतीने नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करुन त्याची हत्या केल्याप्रकरणी नराधम आई चार दिवस पोलिस कोठडीत आहे. आपल्यावर पोलिस कारवाई करतील या भितीपोटी प्रियकराने विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. साहेबराव पवार (56) र. खंडाळा ता. वैजापूर – औरंगाबाद असे मृत्यु झालेल्या प्रियकर आरोपीचे नाव आहे.

वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात नऊ वर्षाच्या सार्थक रमेश बागूल याचा मृतदेह आढळून आला होता. या मृत बालकाची आई व विष प्राशन करुन मृत्यु झालेला आरोपी साहेबराव पवार यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात सार्थक त्यांना अडथळा वाटत होता. त्यातून प्रियकर साहेबराव पवार व कुमाता संगिता रमेश बागुल या दोघांनी त्याच्या अपहरणाचा बनाव करुन त्याची हत्या केली होती. तपासापुर्वीच आरोपीचा मृत्यु झाला असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here