हिटरचा शॉक लागून महिला मृत्युमुखी

जळगाव : घरात पाणी गरम करण्याच्या हिटरचा शॉक लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी शहराती योगेश्वर नगरात घडली. या घटनेप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सुषमा प्रकाश महाजन (50) रा. योगेश्वरनगर जळगाव असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेचे नाव आहे.

हॉटेलमध्ये काम करणारे प्रकाश महाजन यांच्या पत्नीला शॉक लागल्याची घटना घडली तेव्हा ते मंदीरात गेले होते. दरम्यान त्यांची पत्नी सुषमा  महाजन यांनी हिटरचा वापर करुन बादलीत पाणी गरम करण्यासाठी लावले होते. पाणी तापले अथवा नाही हे बघण्यासाठी त्यांनी बालटीला हात लावला असता विजप्रवाह बादलीत उतरल्याने त्यांना जोरात धक्का बसला.  या घटनेत त्यांचा मृत्यु झाला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here