संगीत वादन वाहनाच्या धक्क्याने भिंत कोसळून बालक ठार

जळगाव : मिरवणुकीत संगीत वादनाचे वाहन मागेपुढे करत असतांना लागलेल्या धक्क्यात भिंत कोसळून बारा वर्षाचा बालक ठार तर इतर तिघे जखमी झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील वाडी येथे शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात  शोककळा पसरली आहे. जखमी युवकाने कोसळणाऱ्या भिंतीचा काही भाग धरुन ठेवल्याने दोन बालक बचावले मात्र त्यांच्यासह युवक जखमी झाला आहे. हर्षल गोकुळ पाटील (खंबाट) (12) असे मयत बालकाचे तर  प्रदीप प्रकाश तळेकर (22), रोहित विनोद गव्हांडे (12) आणि साही रामेश्वर शिंदे (10) अशी जखमींची नावे आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीदरम्यान सदर घटना घडली. तिघा जखमींवर पाचोरा येथील दवाखान्यात उपचार सुरु आहेत. प्रदीप प्रकाश तळेकर या तरुणाने प्रसंगावधान राखत पडणारी भिंत खांद्यावर पेलून धरल्याने त्याच्यासह दोन बालके जखमी झाली मात्र त्यांचे लाख मोलाचे प्राण वाचले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here