जळगाव जि.प. निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार

जळगाव : जळगाव जिल्हा परिषद पंचवार्षिक मुदत येत्या मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. निवडणूकीच्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणूकीत सहभागी होण्यासाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. तशी घोषणा माजी मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे. इतर पक्षांची आघाडी होणार की स्वबळावर लढणार याबाबतीत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.  

जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत भाजपची सत्ता आहे. ती सत्ता टिकवून ठेवण्यासाठी चाळीसपेक्षा अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. एकुण 77 जागा असून त्या सर्व जागा भाजप स्वबळावर लढवणार आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीतील तिघा पक्षांना त्या जागा वाटून घ्याव्या लागणार असल्याचे दिसत आहे. 

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here