गळ्यात पडली वरमाला, लग्नात नाचल्या बारबाला!- पुणेकरांच्या विवाहाचा थाट होता अगदीच निराला!!

jain-advt


पुणे : पुणे तेथे काय उणे असे म्हणतात ते काही उगाच नाही. पुणे येथील वडारवाडी भागातील एका लग्न समारंभात बारबाला नाचवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुण्याच्या वडारवाडी भागात एका लग्न सोहळ्यातील मंडपात बारबाला व त्यांच्या सोबत तरुणांचे बिभत्स नृत्य सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर आले आहे. या प्रकाराचा एक व्हिडीओ देखील समाज माध्यमांमधे प्रसारीत झाल्याचे म्हटले जात आहे.

बारबालांसमवेत नृत्य करणारे तरुण त्यांना पैसे देत असल्याचे देखील व्हिडीओत दिसत असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाच्या अटींमधे बरीच शिथीलता आली असल्यामुळे लग्न समारंभावर आधारीत व्यवसाय ब-यापैकी तेजीत आले आहेत. मात्र आता चक्क बारबालांच्या माध्यमातून लग्नसमारंभाचा उत्साह वाढवला जात असल्याचा प्रकार पुढे येत असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी कुणाचीही तक्रार नसल्याने पोलिसात कुठलीही तक्रार दाखल झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here