बहिणीचे शिर कापणारा अल्पवयीन सज्ञान समजणार

बीड : प्रेमविवाह करणा-या तरुणीचे शिर आईच्या मदतीने भावाने कोयत्याने कापल्याची घटना वैजापूर तालुक्यात 5 डिसेंबर रोजी घडली होती. किर्ती उर्फ किशोरी अविनाश थोरे असे 19 वर्ष वयाच्या हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी संशयीत अल्पवयीन मुलाविरुद्ध वैजापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रौढ आरोपी म्हणून खटला चालवण्यास बाल न्याय मंडळाकडून मान्यता मिळाली आहे.

वीरगावचे स.पो.नि. विजय नरवडे यांनी बाल न्याय मंडळाकडे “जुवेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन रुल्स’ जेजे अ‍ॅक्ट कायद्यातील तरतुदीच्या आधारे सोळा वर्षाच्या संशयीत अल्पवयीन आरोपीला प्रौढ समजले जावे अशा मागणीचा अहवाल सादर केला होता. तपासणीअंती बाल न्यायमंडळाने दोषारोपपत्रासह तो अहवाल वैजापूरचे जिल्हा सत्र न्यायधीशाकडे सादर केला.  या अहवालाची पडताळणी करुन न्यायाधीशांनी विधि संघर्षग्रस्त बालकाला प्रौढ समजले जाऊन खटला जिल्हा सत्र न्यायालयात चालवण्याकामी परवानगी दिली आहे. प्रेमविवाह करणा-या तरुणीची भर दिवसा शिर कापून करण्यात आल्यानंतर ते घराच्या ओट्यावर आणून टाकले होते. या घटनेची संपुर्ण देशात चर्चा झाली होती.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here