मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला सक्तमजुरीची शिक्षा

jain-advt

औरंगाबाद : आपल्याच मुलीचा विनयभंग करणा-या जन्मदात्या बापाला पोक्सो कायद्यानुसार पाच वर्ष सक्तमजुरीसह साडेतीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास विविध कलमाप्रमाणे दीड महिना कारावासाची शिक्षा न्या. ए.एस. खडसे यांच्या न्यायालयाने सुनावली आहे.

मुकुंदवाडी येथील 35 वर्षाच्या महिलेने याप्रकरणी 6 सप्टेबर 2020 रोजी मुकुंदवाडी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर महिला तिच्या पती व सतरा वर्षाच्या मुलीसह एकत्र रहात होते. मद्याच्या नशेत असलेला महिलेचा पती तिच्या मुलीवर वाईट नजर ठेवत असे. सदर महिलेला अर्धांगवायू झाला असल्याचा गैरफायदाघेत तो रात्रीच्या वेळी लाईट बंद करुन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे पती पत्नीत अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here