जळगावात चाकूहल्ला प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगार भोलासिंग बावरी याच्यावर झालेल्या चाकूहल्ल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

27 फेब्रुवारीच्या रात्री अकरा वाजता भोलासिंग बावरी (रा. शिकलकर वाडा शिरसोली नाका जळगाव) हा त्याच्या दोघा मित्रांसह सिंधी कॉलनीनजीक चेतनदास दवाखान्याजवळ उभा होता. त्यावेळी पल्सर मोटार सायकलवर तिघे तरुण त्याच्याजवळ आले. त्यातील एकाने भोलासिंग यास मारहाण करत त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात भोलासिंगच्या पोटात व हातावर जखम झाली. त्यानंतर तिघे अज्ञात तरुण पळून गेले. जखमी भोलासिंग बावरी यास सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची माहिती मिळताच सहायक फौजदार अतुल वंजारी, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, सचिन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. अज्ञात हल्लेखोरांच्या मागावर पोलिस पथक आहे. पुढील तपास हे.कॉ. योगेश सपकाळे करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here