अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार ठार

jain-advt

जळगाव : भुसावळ – जळगाव दरम्यान महामार्गावरील बुलेट शो रुमसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला आहे. या घटनेप्रकरणी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर विजय राणे (30) रा. हिंगोणा ता. यावल असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सागर राणे हा जळगाव येथे डॉ. सचिन सरोदे यांच्याकडे नोकरीला होता. तो हिंगोणा येथे 26 फेब्रुवारी रोजी आपल्या आईवडीलांना भेटण्यासाठी आला होता. आई वडीलांची भेट घेतल्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास तो हिंगोणा येथून जळगावच्या दिशेने मोटारसायकलवर (एमएच 19 डीएम 3264)येण्यास निघाला. दरम्यान वाटेत 27 फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास महामार्गावरील बुलेट शो रुमनजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत सागर जखमी झाला. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या घटनेप्रकरणी शरद जावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here