वासुकमल बिल्डर्सचे नरेंद्र काबरा यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा

जळगाव : खरेदीखतात नमुद कारपेट क्षेत्राचा फ्लॅट न देता तसेच जळगाव महानगर पालिकेच्या मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम केले नसल्याच्या व इतर विविध आरोपाखाली जळगाव येथील वासुकमल बिल्डर्सचे संचालक नरेंद्र काबरा व इतरांविरुद्ध जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नरेंद्र झिपरुलाल काबरा, लव नरेंद्र काबरा दोघे रा. 71 वासुकमल नवीपेठ जुने बस स्टॅंड समोर जळगाव , रौनक जैन रा. संगम सोसायटी रिंगरोड जळगाव, सौ. शितल विशाल लाठी, गायत्री राठी दोघे रा. वासुकमल विहार गुजराल पेट्रोल पंपासमोर जळगाव अशा एकुण पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. अश्विनी चेतन कपोले यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 सप्टेबर 2020 पासून 10 मार्च 2022 या कालावधीत फिर्यादी व इतर फ्लॅटधारकांना खरेदीखतात नमुद कारपेट क्षेत्राचा फ्लॅट देण्यात आला नाही. जळगाव मनपाच्या मंजूर नकाशानुसार बांधकाम करुन देण्यात आले नाही. फ्लॅट बुकींगच्या वेळी देण्यात आलेल्या माहिती पुस्तीकेनुसार नमुद सुख सुविधा न देता परस्पर वासुकमल विहार फ्लॅट ओनर्स असोसिएशनची स्थापना करुन संगनमत व कटकारस्थान करुन सौ शितल विशाल लाठी यांना ते फ्लॅट धारक नसतांना सोसायटीचे अध्यक्ष केले. अशा विविध आरोपांचा फिर्यादीत समावेश आहे. पो.नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रदीप चांदेलकर करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here