त्या वादग्रस्त दारु विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : जळगाव शहराच्या खोटे नगर परिसरातील हॉटेल राधिकाच्या मागे असलेल्या अवैध दारु विक्रेत्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दारु विक्रेत्यांवर कारवाई करु नये यासाठी एका पोलिस कर्मचा-याने आपल्याच सहका-यांना विरोध केला होता. या विरोधाचे रुपांतर हाणामारीत झाल्याचे अनेकांनी पाहिले. हा वाद पोलिस स्टेशनच्या आवारापर्यंत गेला होता.

दारु विक्रेत्याचे समर्थन करुन त्यांच्याविरुद्ध कारवाई करु नये यासाठी एक पोलिस कर्मचारी आग्रही होता. त्या दोघा दारु विक्रेत्यांकडून दरमहा ठराविक धनराशी प्राप्त होत असल्याचे म्हटले जात आहे. त्या दारु विक्रेत्यांच्या कब्जातून 2610 रुपये किमतीची गावठी व टॅंगो पंच दारु जप्त करण्यात आली आहे. याशिवाय इतर ठिकाणी गावठी हातभट्टी व सट्टा जुगारावर देखील जळगाव तालुका पोलिस स्टेशनच्या पथकाने आज कारवाया केल्या आहेत. त्या कारवाईत पोलिस उप निरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, साहेबराव पाटील, ईश्वर लोखंडे, विश्वनाथ गायकवाड, अनिल मोरे, अभिषेक पाटील आदींनी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here