बालिकेवर अत्याचार प्रकरणी आरोपीस मरेपर्यंत कारावास

जळगाव : पाच वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणा-या आरोपीस नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच एकत्रीत पाच हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयाने सुनावली आहे. संदीप सुदाम तिरमली (36) रा. शिरसगाव ता. चाळीसगाव जिल्हा जळगाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दिनांक 3 जानेवारी 2021 रोजी रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास पिडीत बालिका ही तिच्या मैत्रिणीसोबत अंगणात खेळत होती. दरम्यान आरोपी संदीप सुदाम तिरमली याने पिडीत बालिकेस खाऊ देण्याचे आमिष दाखवत तो राहत असलेल्या घरी घेऊन गेला. तसेच तिला दहा रुपयांच्या तिन नोटा देत तिच्यावर त्याने बळजबरीने शारिरीक अत्यावर केला. त्यानंतर पिडीत बालिका रडत रडत घरी आली. ती आली तेव्हा तिच्या हाताच्या मुठीत १० रुपयाच्या ३ नोटांना रक्ताचे डाग लागलेले होते.

Advocate Ketan Dhake

तिने सर्व हकीगत फिर्यादीला कथन केली. त्यामुळे फिर्यादीने सदर आशयाची फिर्याद दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी मेहुणबारे पोलिस स्टेशनला दाखल केली. त्या अनुषंगाने पोलीसांनी गु.र.नं. 2/2021 भा.द.वि. 376 (2) (आय), 377 तसेच बाल लैंगीक अपराध प्रतिबंधक अधिनियम 2012 चे कलम 4,6,8,12 नुसार तक्रार नोंदवली. सदर खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात शासकिय अभियोक्ता केतन ढाके यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष, तपासी अंमलदार व डॉक्टर यांची साक्षी खुप महत्वपूर्ण ठरल्या.

सदर कामातील तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस भा.दं.वि. कलम 376 (2)(जे), 376 ऐबी आणि बा.लै. अ.प्र.अधिनियम 2012 चे कलम 3 व 5 अन्वये दोषी धरुन पुढीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे. भा.द.वि. कलम 376 (2) (जे) साठी दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये एक हजार रुपये दंड, भा.द.वि. कलम 376 एबी साठी आजन्म कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड, बा.लै अ.प्र. अधिनियम 2012 चे कलम 3 साठी 7 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड, बा.लै अ.प्र.अधिनियम 2012 चे कलम 5 साठी दहा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड.

सदर आरोपीने यापुर्वी मेहुणबारे पो.स्टे. येथील गु.र.नंबर 46/2012 नुसार भा.द.वि. कलम 376 च्या गुन्हयात सात वर्षाची शिक्षा भोगुन आल्यानंतर पुन्हा दुसरा गुन्हा केला आहे. याकामी सरकार पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता केतन जे. ढाके यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पाच वर्ष वयाच्या लहानग्या मुलीसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या प्रतिमेला काळीमा फासणारे असल्याचा देखील युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे न्यायालयाने आरोपीस दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी देविदास कोळी तसेच केस वॉच दिपक महाजन यांनी सहकार्य केले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here