25 लाखांपर्यंतच्या बीएचआरच्या ठेवी मिळणार जूनपर्यंत

जळगाव : बीएचआर अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी या अवसायनातील मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परताव्याचे एक धोरण तयार करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार मार्च ते जून या काळातील 25 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीची वीस टक्के धनराशी देण्याचे निश्चीत करण्यात आल्याचे अवसायक चैतन्यकुमार नासर यांनी म्हटले आहे.
केवायसी जमा करण्याचे आवाहन ठेवीदारांना करण्यात आले होते. सदर संस्था अवसायनात असल्यामुळे मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अ‍ॅक्ट 2002 चे कलम 90 प्रमाणे

ठेवीदारांना संस्थेकडे त्यांच्या ठेव रकमेची मागणी करणे आवश्यक आहे. प्राधान्य क्रमानुसार संस्थेच्या कायद्याप्रमाणे ठेवीदारांना त्यांचा परतावा देण्याचे काम केले जात आहे. वैद्यकीय, जेष्ठ नागरिक, लग्नकार्य, शैक्षणीक आदी कामकाजासाठी ग्राहक मंचाच्या आदेशानुसार आजच्या घडीला पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव रकमेपैकी पहिला टप्पा प्रो रेटनुसार वीस टक्के रकमेचे वितरण सुरु आहे. ठेवीदारांनी मुळ ठेव पावतीआणि क्लेम फॉर्म संस्थेत सादर केल्यानंतर त्यांना संस्थेच्या नियमानुसार ठेवीच्या मुळ रकमेपैकी वीस टक्के रकमेचा पहिला टप्पा दिला जात आहे. ब-याच ठेवीदारांनी अद्याप केवायसी जमा केलेली नाही. तीन लाख रकमेपर्यंत्च्या ज्या ठेवीदारांनी मूळ पावती व क्लेम फॉर्म संस्थेत सादर केले आहेत त्या ठेवीदारांच्या बॅंक खात्यात एनईएफटीच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here